पेण – दि. १६ (प्रतिनिधी) पेण नगरपरिषदेच्या भव्य मैदानावर स्वररंग तर्फे भरविण्यात आलेल्या पेण फेस्टिवल मध्ये जल्लोषपूर्ण वातावरणात मिस्टर रायगड स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत रोह्याचा ओमकार जाधव हा मिस्टर रायगडचा अंतिम विजेता ठरला. तर माणगावचा केतन बिरवाडकर याने स्पर्धेत द्वितिय व भिंवडीचा प्रतीक थळे याने तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील १३ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेतील बेस्ट कॉस्टयूम सिध्देश मोकल (पनवेल), बेस्ट हेअर स्टाईल प्रणित केणी (पनवेल), तर बेस्ट पर्सनॅलिटी अमन सिंग (मुंबई) बेस्ट फोटोजनिक पियूष भोई (रोहा) बेस्ट वॉक सोहम पाटिल (अलीबाग) या स्पर्धकांना अवॉर्ड देऊन सन्मानीत करण्यात आले. सदर स्पर्धेचे परिक्षण कमलेश ठाकुर, विजय मोकल, स्नेहल सावंत, शुभम दिवेकर तर कोरियोग्राफी जयेश पाटिल तसेच शुभम पाटिल यानी सहाय्यक म्हणून काम केले.
सर्व विजेत्यांना स्वररंगचे मार्गदर्शक तथा सभापती वैकुंठ पाटिल, उपाध्यक्ष भाजपा शर्मीला पाटिल, स्वररंग पेणचे अध्यक्ष प्रा.राजेंद्र साळवी, उपाध्यक्ष सुनील पाटील, अनिकेत साळवी, कार्याध्यक्षा अक्षता साळवी सावंत, सचिव कौस्तुभ भिडे, खजिनदार भारती साळवी, पेण प्रेस क्लबचे अध्यक्ष देवा पेरवी, सहसचिव अनिरुद्ध पवार, मृगज कुंभार, यश बांदिवडेकर, तन्मय शिर्के, प्रशांत पाटेकर, किरण मोहिते, दर्शना पाटेकर, सारिका पाटील, शाल्मली भिडे, नेहा कुंभार, अथर्व सावंत, भाग्यश्री पवार, सृष्टी सूर्यवंशी, अश्विन पाटिल, सुरेश सावंत यांच्यासह स्वररंगचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य आदि मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
पेण-रायगड सह मुंबई, नवी मुंबई, कोल्हापूर, रोहा,अलिबाग, खोपोली, माणगाव, महाड, ठाणे, उरण , पनवेल अश्या विविध भागांतील एकूण १३ स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. ट्रेडिशन, इन्ट्रोड्यूस राउंड, वेस्टन राउंड व प्रश्नोत्तर राउंड अशा दोन राउंड मध्ये स्पर्धा सादर करण्यात आली. या स्पर्धेला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. १३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत सुरू झालेला पेण फेस्टिवल दिवसेंदिवस रसिकांची गर्दी खेचत आहे.सदर स्पर्धेचे सूत्रसंचालन सुभाष टेंबे यानी केले.यावेळी महिलासाठीच्या लकी ड्रॉ स्पर्धेमध्ये विजेत्या नीलम मोकल (साई) व नेहा ठाकूर (पेण) यांना मानाची पैठणी भेट देण्यात आली































Leave a Reply