यशवंतदादा घासे उद्योजकयांच्या निवासस्थानी बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी!

भक्तिमय वातावरणात बाप्पाचे पूजन !

पेण प्रतिनिधि – किरण बांधणकर

पेण तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक तथा एकता ट्रान्सपोर्टचे मालक यशवंतदादा घासे यांच्या निवासस्थानी बारा दिवसांसाठी गणरायाची भक्तिभावाने प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

आकर्षक मखर, मनमोहक सजावट आणि विद्युत रोषणाईने बाप्पाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने घासे यांच्या निवासस्थानी दररोज आरती, संगीत भजन आणि पारंपरिक गीत-नृत्याचे आयोजन करण्यात येत असून, त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला आहे.

बाप्पाच्या दर्शनासाठी शासकीय व प्रशासकीय अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते तसेच आप्तेष्ट आणि नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

यशवंतदादा घासे व त्यांच्या कुटुंबीयांकडून दररोज मनोभावे गणरायाची पूजा-अर्चा केली जात असून, बारा दिवसांचा हा गणेशोत्सव भक्ती, परंपरा आणि आपुलकीच्या वातावरणात साजरा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *