। पेण । वार्ताहर ।
स्वररंग तर्फे पेण नगरपरिषदेच्या भव्य मैदानावर भरलेल्या पेण फेस्टिवल 2023 मध्ये शुक्रवारी झालेल्या मिस रायगड स्पर्धेत नागोठणेची प्रांजल घांगुर्डे ही मिस रायगडची अंतिम विजेती ठरली. तर पेणची यशश्री सुरावकर या स्पर्धेतील फस्ट रनरअपचे तर पेणची चेतना म्हात्रे हिने सेकंड रनरअपचे पारितोषिक पटकावले.
या स्पर्धेतील बेस्ट कॅटवॉक लावंण्या भगत (पेण), बेस्ट स्माईलचे अस्मिता साबळे (डोंबिवली), बेस्ट हेअरचे सुचिता शिंदे (मुंबई), बेस्ट फोटोजनिकचे आज्ञा म्हशीलकर (नालासोपारा), बेस्ट पर्सनालीटीचे आदिती पाटील (पेण), बेस्ट कॉस्ट्यूमचे प्रियल मोरे (पेण) या स्पर्धकांनी पारितोषिके जिंकली. या स्पर्धेत एकूण २३ सौदर्यवतींनी सहभाग घेतला होता. सर्वानीच आपल्या मनमोहक अदा सादर करून रसिकांना मोहित केले. या स्पर्धेसाठी रसिकांनी विशेषत युवा वर्गाची मोठी उपस्थिती दर्शविल्याने स्टेज समोरील प्रांगण खचाखच भरले होते. आजचा मिस रायगड २०२३ हा के एन डेव्हलपर्स आणि इंजिनियर्स एलएलपी द्वारे स्काय विला यांनी प्रायोजित केला होता.. सर्व मिस रायगड २०२३ चे जे मेकअप आणि हेअर हे श्री सदगुरू कृपा अॅकेडमी सलग्न रेड रोझ ब्युटी क्लिनिक सुबोध शाळेजवळ पेण प्रो.पा श्री.सचिन रावकर आणि सौ.दर्शना तावडे यांनी प्रायोजित केले होते.
सर्व विजेत्यांना अध्यक्ष प्रा. राजेंद्र साळवी (सर), स्वररंगचे मार्गदर्शक वैकुंठ पाटील, कोकणातील प्रसिध्द उदयोजक शामकांत खातू, उदयोजक यशवंतदादा घासे, राजूशेठ पिचिका, प्रकाश झावरे, शर्मिला पाटील, नरेशशेठ जैन, खजिनदार भारती साळवी, उपाध्यक्ष सुनिल पाटील, सचिव कौस्तुभ भिडे, पेण प्रेस क्लब अध्यक्ष देवा पेरवी, अनिकेत साळवी, अथर्व सावंत, मृगज कुंभार, अनिरुद्ध पवार, सारिका पाटील, नेहा कुंभार, निशा साळवी, अभिराज कणेकर, यश बांदीवडेकर, प्रसाद म्हात्रे, राज पाटील, सृष्टी सूर्यवंशी, प्रेरणा रामधरणे, तन्वी रामधरणे, श्वेता म्हात्रे, प्रशांत पाटेकर, दर्शना पाटेकर, किरण मोहिते आदि मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
साडी रांउड, वेस्टन राउंड व ईव्हीनींग गाउन राउंड अशा तीन राऊंडमध्ये सादर करण्यात आलेल्या या स्पर्धेची कोरिओग्राफी रुपेश चव्हाण मुंबई व त्यांचे सहाय्यक कोरिओग्राफर शैलेश साळूंखे, कोओरडीनेटर निखिल बाचल यांनी साकारली. तर टीव्ही अँकर ऋषी देसाई यांच्या उत्कृष्ठ समालोकचनाची साथ या स्पर्धेला लाभली. परिक्षक म्हणून सिने अभिनेत्री मयुरी राणे, प्रो.अक्षता साळवी, सिने लेखक सिध्दार्थ साळवी, डॉ.आरती चेंदवणकर लावणी सम्राज्ञी सोनाली पवार यांनी काम पाहिले.
तसेच यावेळी पेणकरांच्या आग्रहास्तव दिनांक २८ नोव्हेंबर २०२३ रोजी डूएट डान्स स्पर्धा आयोजित केल्याचे अध्यक्ष साळवी सर यांनी सांगितले.