पेण रिक्षा चालक मालक संघटने तर्फे गणेश भक्तांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर
शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उपक्रम राबवण्यासाठी गॅलेक्सी हॉस्पिटलचे सहकार्य!
पेण प्रतिनिधि – किरण बांधणकर
पेण रिक्षा चालक-मालक संघटनेकडून यावर्षी ही मोठ्या आनंदात
गणपती बापाची स्थापना करण्यात आली आहे यंदा संघटनेचे ४६ वे वर्ष असून मोठ्या उत्साहाच्या वातावरणात गणेश उत्सव साजरा करण्यात येत आहे.
पेण रिक्षा चालक मालक संघटने तर्फे यंदा गॅलेक्सी हॉस्पिटल यांच्या सहकार्यातून गणेश भक्तांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला गणेशभक्त नागरिकांनी उस्फुर्त असा प्रतिसाद दाखवत आरोग्य तपासणी करण्यात आली.
यावेळी गणेशोत्सवा दरम्यान पेण रिक्षा चालक-मालक संघटनेकडून समाज उपयोगी कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. त्याच प्रमाणे यंदा गणेश भक्तांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिराचा लाभ नागरिकांनी घेण्याचे आवाहन अध्यक्ष भरत रामचंद्र पाटील व
माजी अध्यक्ष किरण म्हात्रे यांनी केले.
पेण रिक्षा चालक मालक संघटनेचे गणेशोत्सवाचे ४६ वे वर्ष असून स्थापना करण्यात आलेल्या गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
अध्यक्ष भरत रामचंद्र पाटील उपाध्यक्ष भानुदास पाटील माजी अध्यक्ष किरण म्हात्रे,माजी अध्यक्ष दत्तात्रय म्हात्रे,पांडुरंग पाटील,चंद्रकांत भोईर, सुभाष पाटील, अमित आंब्रे, महेश पडवळ,कृष्णा पाटील,राजू पवार,दत्तात्रय साजेकर,संतोष खेडेकर,रमेश म्हात्रे,काशिनाथ पाटील,जनार्दन उमरोटकर, राजू जाधव, सुनील साळुंखे सचिन पाटील आदी पदाधिकारी सदस्य यावेळी उपस्थीत होते.
































Leave a Reply