स्वररंग आयोजित पेण फेस्टिवलचे आज उद्घाटन

स्वररंग आयोजित पेण फेस्टिवलचे आज उद्घाटन

13 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर 2026 पर्यंत पेण नगरपालिकेच्या मैदानावर विविध स्पर्धा

पेण- दि.13

स्वररंग पेण आयोजित पेण फेस्टिवल 2026 चे शानदार उद्घाटन आज शुक्रवार 13 नोव्हेंबर रोजी अनेक मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. सदर फेस्टिवल आज पासून 29 नोव्हेंबर 2026 पर्यंत 17 दिवस पेण नगरपरिषदेच्या भव्य मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शालेय नृत्य स्पर्धा या स्पर्धेने या फेस्टिवलचा शुभारंभ होणार आहे.
यावेळी पेण फेस्टिवलचे उद्घाटन अनेक दिग्गज मान्यवरांसह स्वररंगचे अध्यक्ष प्रा.राजेंद्र साळवी, उपाध्यक्ष सुनिल पाटील, कार्याध्यक्ष अक्षता सावंत, सचिव कौस्तुभ भिडे, खजिनदार भारती साळवी, पेण प्रेस क्लब अध्यक्ष देवा पेरवी, सहसचिव अनिरुद्ध पवार, मृगज कुंभार, यश बांदिवडेकर सर्व पदाधिकारी सर्व सदस्य तसेच मा.आमदार रवीशेठ पाटील मा. खासदार धैर्यशील पाटील, मा. वैकुंठदादा पाटील,पेणच्या नगराध्यक्ष प्रीतम पाटील, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा अध्यक्ष मा.चित्रा पाटील, मा. शर्मिला पाटील, मा. अनिरुद्ध पाटील गटनेता पेण  नगरपरिषद आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. स्वररंग इंटरटेन्मेंट, साज मराठी न्यूज चॅनल हे संपूर्ण कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर असणार आहेत.

विविध खाद्यपदार्थ व स्पर्धांची रेलचेल
स्वररंग पेण आयोजित स्वररंग इंटरटेन्मेंट, साज मराठी न्यूज चॅनल या मीडिया पार्टनरच्या समवेत पेण नगरपरिषदेच्या मैदानावर 13 नोव्हेंबर 2026 ते 29 नोव्हेंबर 2026 पर्यंत 17 दिवस सायंकाळी 5.00 वाजल्यापासून रात्रौ 10.00 वाजेपर्यंत पेण फेस्टिवल भरविण्यात आले आहे. यामध्ये विविध खाद्यपदार्थ, गृहपयोगी वस्तू यांची दुकाने, मनोरंजनाची साधने, महिलांकरिता शृंगारिक प्रसाधने, बाळ गोपाळांसाठी खेळांची साधने तसेच युवक युवतींकरिता मनोरंजनाचे कलाविष्कार, आकाश पाळणे, मेरिगो राउंड, मौत का कुवा, लहान मुलांसाठी खेळण्याची विविध साधने उपलब्ध करण्यात आली आहेत. त्याच प्रमाणे या फेस्टिवल मध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बहुरंगी नमन दशावतार, शक्ती तुरे सामने, मिस रायगड, शिवशाहीर वैभव घरत, किड्स फॅशन शो, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, शरीर सौष्ठव स्पर्धा, गाण्यांच्या स्पर्धा, मिस्टर रायगड, मिसेस रायगड, वैयक्तिक नृत्य, सामूहिक नृत्य, गायन स्पर्धा, युगल नृत्य स्पर्धा, अशा विविध स्पर्धांची दररोज रेलचेल असणार असल्याची माहिती स्वररंग पेणचे अध्यक्ष राजेंद्र साळवी आणि कार्याध्यक्ष अक्षता साळवी यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *