Banner Top

पेण-दि.11 (प्रसादम्हात्रे) – स्वररंग पेण तर्फे आयोजित केलेल्या पेण फेस्टिवल 2025 मध्ये सोमवारी झालेल्या सर्वात मोठ्या मिस रायगड स्पर्धेत पेणची रिया दिनेश कांबळे ही मिस रायगडची अंतिम विजेती ठरली. तर अलिबागची प्रिया विजय पाटील या स्पर्धेतील फस्ट रनरअप तर नवी मुंबईची यशस्विनी परशुराम पाटील हिने सेकंड रनरअपचे पारितोषिक पटकावले.

   या स्पर्धेतील बेस्ट कॅटवॉक सृष्टी कांचन पेरवी (दादर), बेस्ट पर्सनालीटी यामिनी गणेश पाटील (पेण), बेस्ट स्माईल मनस्वी किशोर लोहार (पेण), बेस्ट हेअर प्रतिभा विजय वाघमारे (पेण), बेस्ट फोटोजनिक तन्वी संतोष पाटील, बेस्ट कॉस्ट्यूम अपूर्वा रवींद्र पाटील (पेण) या स्पर्धकांनी पारितोषिके जिंकली. या स्पर्धेत संपूर्ण रायगड जिल्ह्यातून एकूण 18 सौदर्यवतींनी सहभाग घेतला होता. सर्वांनीच आपल्या मनमोहक अदा सादर करून रसिकांना मोहित केले. या स्पर्धेसाठी रसिकांनी विशेषता युवा वर्गाची मोठी उपस्थिती दर्शविल्याने स्टेज समोरील प्रांगण खचाखच भरले होते.

    सर्व विजेत्यांना शर्मिला पाटील, प्रीतम पाटील, पेण फेस्टिवल स्वररंग पेण चे अध्यक्ष राजेंद्र साळवी, पेणचे प्रसिध्द उद्योजक नरेश जैन, खजिनदार भारती साळवी, उपाध्यक्ष सुनिल पाटील, सचिव कौस्तुभ भिडे, पेण प्रेस क्लब अध्यक्ष देवा पेरवी, अक्षता सावंत, अनिकेत साळवी, अथर्व सावंत, मृगज कुंभार, अनिरुद्ध पवार, सारिका पाटील, नेहा कुंभार, निशा साळवी, यश बांदीवडेकर, प्रसाद म्हात्रे, सृष्टी सूर्यवंशी, प्रेरणा रामधरणे, तन्वी रामधरणे, प्रशांत पाटेकर, दर्शना पाटेकर, आदि मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

   मिस रायगड 2025 मध्ये साडी रांउड, वेस्टन राउंड व ईव्हीनींग गाउन राउंड अशा तीन राऊंडमध्ये सादर करण्यात आलेल्या या स्पर्धेची कोरिओग्राफी रुपेश चव्हाण, मुंबई व सहाय्यक कोरिओग्राफर निखिल बाचल यांनी साकारली. तर टीव्ही अँकर ऋषी देसाई यांच्या उत्कृष्ठ समालोचनाची साथ या स्पर्धेला लाभली. तर परिक्षक म्हणून वडापाव सिनेमा लेखक सिद्धार्थ साळवी, डॉ.माधवी ठाकुर, डॉ.आरती चेंदवणकर, प्रो.अक्षता साळवी यांनी काम पाहिले. यावेळी पेण फेस्टिवल २०२५ला ज्या जाहिरातदार यानी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.    

    “सर्वांसाठी सर्वकाही” ही संकल्पना असलेल्या पेण फेस्टिवलला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे स्वररंगचे अध्यक्ष राजेंद्र साळवी सर यांनी सांगितले.