2025 या वर्षाचा कुलाबा जीवन गौरव पुरस्कार सांस्कृतिक विभाग – कौस्तुभ छाया विलास भिडे यांना जाहीर…
पेण : प्रतिनिधी – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194 व्या जयंतीनिमित्त स्व आमदार मधुशेठ ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट, भाई जगताप मित्र मंडळ, व अँड उमेश ठाकूर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक ,शैक्षणिक, कला, क्रीडा ,वैद्यकीय, सांस्कृतिक , व पत्रकरिता, या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना कुलाबा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पेण तालुक्यातील निर्माता, दिग्दर्शक, आयोजक व नियोजक म्हणून कौस्तुभ भिडे गेली अनेक वर्षे सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असून त्याने विनोदी नाटके, व्यवसायिक नाटके, शॉर्ट फिल्म, गाणे, मराठी चित्रपट, पेण फेस्टिवल सारखे फेस्टिवलचे नियोजन यामध्ये त्याने अनेक उल्लेखनीय कामगिरी केल्या बदल त्यांना नुकतेच कुलाबा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कौस्तुभ भिडे यांना अँड.उमेश ठाकूर व आमदार भाई जगताप, माजी आमदार रविंद्र धनगेकर, अँड.प्रवीण ठाकूर, फेमस गायक संतोष चौधरी(दादुस) यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामुळे पेण मध्ये सामाजिक संस्था, संघटना, सर्वच स्तरातून त्याच्यावर आनंदाचा वर्षाव होत आहे.यावेळी सर्व पुरस्कार विजेते,अलिबाग मधील नागरिक, पत्रकार तसेच उमेश ठाकूर मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.