मुंबई, (दिनांक)- दत्त अवधुत एंटरटेनमेंट निर्मित, श्री गणेश प्रॉडक्शन प्रकाशित, दर्पण व्हिजन एंटरटेनमेंट ह्यांच्या तर्फे सादर होत असलेली धमाल विनोदी नाट्य कलाकृती ‘बाप पण भरी देवा’ ह्या आगामी मराठी विनोदी नाटकात एका अनपेक्षित पाहुण्याच्या आगमनाने एका सामान्य कुटुंबात गोंधळ उडतो, त्या गोंधळात तो पाहुणा कोणामुळे आला हे कोणालाही समजत नाही, आणि संशय घरातल्या माणसांवरच येतो. त्यात सगळ्यांची सर्वात मोठी कसरत म्हणजे त्या पाहुण्याला आई पासुन लपवायचे!
हे सर्व घडत असताना प्रेक्षकांची खळखळून हसण्याची खात्री हे नाटक देते. कुटुंबातल्या मुलांचा भाबडेपणा तुम्हाला पोट धरून हसायला भाग पाडतो.
त्यामुळे, जर तुम्ही निव्वळ मनोरंजनासाठी तयार असाल आणि दैनंदिन जीवनातील ताणतणावातून बाहेर पडू इच्छित असाल, तर बाप पण भरी देवा ही उत्तम सुटका आहे.
तुमची तिकिटे आत्ताच बुक करा आणि हशा, आश्चर्य आणि अविस्मरणीय पात्रांनी भरलेल्या रोलर कोस्टरसाठी सज्ज व्हा.
बाप पण भरी देवा ह्या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग येत्या शनिवारी 10 ऑगस्टला दुपारी 4.00 वाजता डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे तसेच 17 ऑगस्टला शनिवारी दुपारी 4.30 वाजता
सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली
आणि 31 ऑगस्ट रोजी शनिवारी रात्रौ 8.30 वाजता आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे होणार आहेत.
सदर नाटकाचे लेखन दर्शना कुलकर्णी ह्यांनी केलेले असुन श्री. राजा अत्रे ह्यांनी ही नाट्यकलाकृती दिग्दर्शित केली आहे. या नाट्य कलाकृती मध्ये झी मराठी वाहिनीवरील स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील रायप्पाची भुमिका करणारे कलाकार देवेंद्र सरदार आणि वेड चित्रपटातील कलाकार आनंद पाटील तसेच टिव्ही मालिकांमध्ये काम करणारे कलाकार स्वप्निल साने, दर्शना कुलकर्णी, नेहा पाटील, साहिल परब, मयुरेश पाटील,उपासना घोसाळकर जुईकर,राकेश म्हात्रे तसेच नाट्य कलाकार व रिल स्टार राजश्री कोळी आणि आदिती पाटील यांनी काम केले असुन पार्श्व संगीत निखील सागळे, रंगभूषा राजेश परब, वेशभुषा ऋषिकेश घाग, प्रकाश योजना दीप घाडगे, नेपथ्य शंतनु पंदेकर आणि केविन यांनी केले असुन सुत्रधार म्हणुन सुरेश भोसले हे काम पहात असुन निर्माता कौस्तुभ छाया विलास भिडे यांनी त्याची निर्मिती केली आहे.
सदर नाट्य कलाकृती निर्माण करण्याचे कारण म्हणजे जास्तीत जास्त निखळ आनंद आणि कलाकारांना संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ही नाट्य कलाकृती निर्मित केली असल्याचे निर्मात्याने प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
ही आनंददायी धमाल विनोदी कॉमेडी बघायला नक्कीच जायला हवं!
#BaapPanBhariDeva #MarathiTheatre #ComedyDrama #FamilyFun