पेण – प्रतिनिधी – पेणच्या दोलांजली आशिष राजेशिर्के यांना दादासाहेब फाळके इंडियन टेलिविजन पुरस्कार पेणच्या दोलांजली आशिष राजेशिर्के यांना सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शनासाठी दादासाहेब फाळके इंडियन टेलिविजन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हॉटेल सहारास्टारो या पंचतारांकित हॉटेल मध्ये दादा साहेब फाळके इंडियन टेलिविजन पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यासाठी नामांकन असलेले कलाकार भारताच्या कानाकोप-यातून आले होते. अशात पेणच्या सौ. दोलांजली आशिष राजेशिर्के यांना सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शनासाठी दादा साहेब इंडियन टेलिविजन 2024 हा पुरस्कार सौ दिपिका चिखलिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी सिने श्रेत्रातील कलाकार उपस्थित होते. पूर्वीही नृत्य क्षेत्रात दोलांजली राजेशिर्के यांना अनेक पुरस्कार मिळालेले असून आतापर्यंतचा हा सर्वोत्कृष्ट पुरस्कार असल्याचे भावना त्यांनी व्यक्त केली आहे.