पेणः प्रतिनिधी
दत्त अवधूत एंटरप्रायझेस, स्वररंग पेण आणि बालगंधर्व कला अकादमी परिवार मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कै. पांडुरंग घांग्रेकर स्मृती चषक राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेचे शानदार आयोजन कौशिकी गार्डन, घांग्रेकर वाडा, दातार आळी जवळील साधनाश्रमा समोर करण्यात आले होते. या स्पर्धेत लहान गटामध्ये प्रथम क्रमांक शेशा हिंदळेकर, द्वितीय क्रमांक हर्षिका वर्टीकर, तृतीय क्रमांक हर्षवर्धन अत्रे, तर लहान गट उत्तेजनार्थ रिध्दी पिंगळे, रायन मनोरे, रुद्र जाधव मोठा गटामध्ये प्रथम क्रमांक अक्षता साळवी, द्वितीय क्रमांक प्रांजल जाधव, तृतीय क्रमांक शुभम गोविलकर तर मोठा गट उत्तेजनार्थ विलसन खराडे, हिमानी गायकर, वैशाली सवने, निलीमा कमाने, शशीकांत नागरे, प्रणव शेडगे यांनी बक्षिसे पटकाविले. या एकपात्री स्पर्धेचे परिक्षण ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर, विनोदी अभिनेते जयवंत भालेकर, राहुल वैदय, आणि नाट्य व चित्रपट दिग्दर्शक राजा अत्रे यांनी केले. तर या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ऋषी देसाई यांनी केले. तर स्पर्धेचे उदघाटन ज्येष्ठ समाजसेवक बापुसाहेब नेने, व.ज.आठवले तसेच ज्येष्ठ रंगकर्मी अंजली पांडुरंग घांग्रेकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजक कौस्तुभ भिडे, शाल्मली भिडे, सुनिल घांग्रेकर, अंजली घांग्रेकर, विलास भिडे, छाया भिडे, सुनिल पाटील, प्रसाद म्हात्रे,महेश हेलवाडे,दिव्या घाडगे, आदिती घाडगे, , दिप घाडगे, वेदांत घाडगे, सॅम जॉर्ज, निरंजन रोडेकर, रिध्दी चेंबुरकर,स्वप्नील साने, महेश भिकावले, अजित साळवी आदीनी विशेष मेहनत घेतली. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी धुळे, जळगाव, सातारा, दापोली, डोंबिवली, पुणे, मुंबई अश्या ठिकाणावरून स्पर्धकांनी भाग घेतला होता.