पेणमध्ये रंगणार कै.पांडुरंग विठ्ठल घांग्रेकर स्मृती चषक राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा
विजयी स्पर्धकांसाठी रोख रक्कम,बक्षीस व प्रमाणपत्र
पेण – दत्त अवधूत एंटरप्रायझेस,स्वररंग पेण आणि बालगंधर्व कला अकादमी परिवार मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कै.पांडुरंग घांग्रेकर स्मृती चषक राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेचे शानदार आयोजन शनिवार दिनांक १७ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ४ वाजता पेण येथील कौशिकी गार्डन, घांग्रेकर वाडा, दातार आळी जवळील साधनाश्रमा समोर करण्यात आले आहे.
या स्पर्धेत पहिला गट हा ६ ते १४ वर्ष वयोगटातील स्पर्धकांचा तर सादरीकरणाचा कालावधी पहिल्या गटासाठी ३ते ५ मिनिटाचा असणार असून प्रथम क्रमांक ३ हजार,द्वितीय क्रमांक २ हजार व तृतीय क्रमांक १ हजार व उत्तेजनार्थ बक्षीस तर या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क १०० रूपये असणार आहे.
तर दुसरा गट १५ वर्षांवरील सर्व स्पर्धकांसाठी असणार असून सादरीकरणाचा कालावधी दुसऱ्या गटासाठी ५ ते ७ मिनिटाचा असून प्रथम क्रमांक ५ हजार, द्वितीय क्रमांक ३ हजार व तृतीय क्रमांक २ हजार व उत्तेजनार्थ बक्षीस तर
तर या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क १५० रूपये ठेवण्यात आले आहे. बक्षिसांचे स्वरूप रोख रक्कम,बक्षीस व प्रमाणपत्र असे असणार आहे.
या स्पर्धेतील प्रवेश फी करिता संपर्क ८७६६५८१८४० तर अधिक माहितीसाठी
कौस्तुभ भिडे ७७२००८२२०९,प्रसाद म्हात्रे ९७६५८२५२२५ व किशोर कुमार ९८९२९०३०७६ संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
*नियम व अटी*
१. प्रवेश फी भरल्याशिवाय तुम्हाला स्पर्धेत सहभागी घेता येणार नाही.
२. स्पर्धा ही सर्वांसाठी खुली राहील.
३. विषयाचे बंधन नाही मात्र भाषा मराठीच राहील.
४. स्पर्धकाने वेळेवर उपस्थित रहावे.
५. स्पर्धेचे सादरीकरण एकदाच असून तिच अंतिम फेरी असेल..
६. नियम व अटींमध्ये फेरबदल करावयाचा झाल्यास तो निर्णय संपुर्णपणे आयोजकांचा राहील.
७. प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.
८. फॉर्म भरताना आपले संपूर्ण नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर पाठवून खात्री करून घ्यावी.
९. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.
१०.स्पर्धा ही व्हिडीओ रेकॉर्ड करून युट्यूब व इतर सोशल मिडीयांवर अपलोड केली जाईल.
_________