Banner Top
Monday, July 7, 2025

मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प – उद्धव ठाकरे

पेण येथे उबाठा शिवसेना गटाची जाहीर सभा

पेण-दि.1 (दीपक लोके)

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आज लोकसभेत अर्थसंकल्प मांडत आहे, मोदी सरकार चा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पेण येथे जाहीर सभेत बोलतांना केले.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाची रायगड जिल्ह्यातील जन संवाद यात्रेची सुरुवात पेण येथून गुरुवारी झाली. पेण प्रायव्हेट हायस्कुलच्या शेजारील नगरपालिका मैदानावर झालेल्या या जाहीर सभेला माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, शिवसेना नेते माजी मंत्री सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर, माजी आमदार मनोहर भोईर, जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, आमदार संजय पोतनीस, बबन पाटील, रायगड जिल्हा संघटक विष्णू भाई पाटील, माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर, शेकाप चे महादेव दिवेकर, स्मिता पाटील, उपजिल्हा प्रमुख अविनाश म्हात्रे, तालुका प्रमुख जगदीश ठाकूर, युवा नेते समीर म्हात्रे यांच्या सह हजारो शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकार वर जोरदार टीका केली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत मांडलेल्या अर्थसंकल्प मध्ये महिला, गरीब, तरुण, शेतकरी या चार वर्गा साठी हा अर्थसंकल्प असल्याचे म्हटले आहे ; निवडणुका जवळ आल्याने दहा वर्षात पहिल्यांदाच मोदींना या वर्गाची आठवण झाल्याची टीका ठाकरे यांनी केली. अदानी म्हणजे देश नाही हे त्यांना आता आठवले याबद्दल त्यांनी मोदींचे आभार मानले. मोदी सरकार चा हा शेवटचा अर्थ संकल्प असल्याची टीका करताना हा अर्थसंकल्प म्हणजे जनतेला टोपी घालणारे सरकार असल्याचे म्हटले.
शेतकऱ्यांना अतिरेकी ठरवणाऱ्या मोदी सरकारला आता जाग आली आहे. त्यांनी
दहा वर्षात मांडलेल्या अर्थसंकल्प चा आढावा घ्या. शेतकऱ्यांना मदत मिळाली का? असा प्रश्न त्यांनी यावेळी केला. मी मुख्यमंत्री असताना निकष च्या पुढे जाऊन मदत केली केली असल्याचे सांगताना रायगडावर निसर्ग व तोकते चक्रीवादळ असे नैसर्गिक संकट आले असताना पंतप्रधान इकडे फिरकले सुद्धा नाहीत. जनतेला चिरडणे हा यांचा विकास असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.
राम भाजप ची प्रॉपर्टी नाही असे सांगतानाच राम मंदिर उभारण्यात शिवसेनेचा हातभार आहे हे विसरून चालणार नाही असे म्हटले. तर मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बरोबर करणारे निरबुद्ध असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
अदानी म्हणजे देश नाही. तुम्ही मणिपूर मध्ये जा. या देशात महिला, गरीब, तरुण देखील आहेत. शेतकऱ्यांना अतिरेकी ठरवणारे हे मोदी सरकार आहे. शेवटचा अर्थसंकल्प आहे. हे सरकार म्हणजे जादू चे प्रयोग करणारे सरकार आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे टोपी घालणारे
या सरकार, यांच्या साठी पहिला खड्डा खणून मताने गाडावे लागले. दहा वर्षात मांडलेल्या अर्थसंकल्प चा आढावा घ्या.
शेतकऱ्यांना मदत मिळाली का? निकष च्या पुढे जाऊन मी मुख्यमंत्री असताना मदत केली होती. रायगडावर संकट आले तर पंतप्रधान फिरकले सुद्धा नाहीत. जनतेला चिरडणे हा यांचा विकास. राम मंदिर मध्ये शिवसेनेचा हातभार आहे हे विसरून चालणार नाही. राम भाजप ची प्रॉपर्टी नाही.
मोदींची तुलना शिवाजी महाराज यांच्या बरोबर करणारे निरबुद्ध आहेत मणिपूर ची आज काय अवस्था आहे ते पहिले बघा असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी लगावला.
रायगड जिल्हा मागील निवडणुकीत देखील मोदी लाटेत वाहून गेला नव्हता मात्र निवडून आलेला खासदार मात्र मोदी लाटेत वाहून गेला आगामी निवडणुकीत हुकूमशाही विरोधात सुनामी येईल असा विश्वास व्यक्त केला.
——————

 

*आगामी निवडणुकीत रायगड मधील गद्दारांना गाडणार*

जनता एकवटते तेव्हा हुकूमशाही ला गाडल्या शिवाय राहत नाही. ही लढाई लोकशाही विरोधात हुकूमशाही अशी आहे. रायगड मधील गद्दारांना यापुढे गाडणार आहे. तटकरे, राणे, शिंदे ही गद्दारांची देखील घराणेशाही आहे. मोदींनी ही सुद्धा घराणेशाही बंद केली पाहिजे. भाजप ने पहिली संपूर्ण घराणेशाही बंद करावी असे उद्धव ठाकरे यांनी आव्हान केले.
—–

FOLLOW US

INSTAGRAM

YOUTUBE