Banner Top
Monday, July 7, 2025

रायगड जिल्ह्यातील शाळांना डिजिटल साहित्य वाटप

शिक्षकांनी डिजिटल साहित्याचा पुरेपूर वापर करावा – आमदार रविंद्र पाटील

पेण ( दीपक लोके ) –  कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या स्थानिक विकास निधीतून रायगड जिल्ह्यातील शिक्षकांना डिजिटल साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करताना पेण विधानसभा मतदार संघाचे आमदार रविंद्र पाटील यांनी आमदार निरंजन डावखरे यांनी आपल्या जिल्हयातील शाळांसाठी जे डिजिटल साहित्य दिले आहे त्याचा पुरेपूर वापर विद्यार्थ्यांसाठी करावा असे सांगितले.पेण येथील भाजपच्या कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला पेणचे आमदार रविंद्र पाटील, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, आमदार निरंजन डावखरे यांच्या पत्नी निलिमा डावखरे, भाजपचे तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर पाटील, डी बी पाटील, बाजार समितीचे माजी सभापती शरद एरणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कोकणातील शाळा डिजिटल करण्याचा निर्धार करून विद्यार्थ्यांना आधुनिकतेचे धडे देण्यासाठी विशेष करून हे डिजिटल साहित्य वाटप करण्यात आले आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील विविध शाळांमधील उपस्थित शिक्षक,मुख्याध्यापक यांना आपल्या शाळेसाठी प्रिंटर, संगणक, प्रोजेक्ट यांसारखे डिजिटल साहित्य वाटप करण्यात आले. आमदार रविंद्र पाटील यांनी बोलताना देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात डिजिटल इंडियाचा नारा दिला असुन त्याचे आपल्या कोकणात डिजिटल साहित्य वाटप करून एक वेगळ्या पद्धतीने नारा देत आहेत. मात्र आपण शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी त्याचा पुरेपूर वापर करून नवी पिढी तयार करा असे सांगितले. तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी ज्या ठिकाणाहून पदवीधर घडतात त्या शाळा महाविद्यालयांना अशा प्रकारचे साहित्य वाटप करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आमदार निरंजन डावखरे यांनी घेतला असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन करताना उद्याचा देश घडवायचा असेल तर अशा विद्यार्थ्यांवर संस्कार करण्यासाठी हे विध्यार्थी डिजिटल जगात प्रवेश करावीत आणि त्यांना ती डिजिटल भाषा समजावी ही दूरदृष्टी ठेवून आमदार निरंजन डावखरे यांनी हा डिजिटल साहित्य वाटपाचा निर्णय घेतला असावा असे सांगितले.

FOLLOW US

INSTAGRAM

YOUTUBE