Banner Top
Monday, July 7, 2025

*पेणमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेचे स्वागत*

*उज्वला, PMAY, PM- Swanidhi, आयुष्यमान भारत, आधार व इतर योजनांच्या जनजागृतीसाठी आयोजित शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद*

पेण ( विनायक पाटील ) : केंद्र शासनाच्या विविध योजना जनसामान्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेच्या आयोजन करण्यात आले आहे उज्वला, PMAY, PM- Swanidhi, आयुष्यमान भारत, आधार कार्ड अपडेट व इतर योजनांची माहिती मिळावी यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे माजी नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी सांगितले.

विकसित भारत संकल्प यात्रेचे शनिवार दि.१६/१२/२०२३ रोजी सकाळी १०.०० वा. पेण नगरपरिषदेत आगमन झाले आहे. या यात्रेचे स्वागत करण्यात आले. त्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या महत्वाच्या योजना उज्वला, PMAY, PM- Swanidhi, आयुष्यमान भारत, आधार अपडेट व इतर योजनांची माहिती सामान्य जनतेपर्यत पोहचवणे तसेच यामध्ये अधिकाधिक लोकांचा सहभाग प्राप्त करुन घेणे यासाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. सदर कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. लाभार्थी यांच्याशी संवाद साधून केंद्र शासनाच्या महत्वाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी पेण नगर परिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील, माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील, माजी गटनेते अनिरुद्ध पाटील, माजी उपनगराध्यक्ष वैशाली कडू, माजी नगरसेवक राजा म्हात्रे, माजी नगरसेवक गुरु बाफणा, माजी नगरसेविका तेजस्विनी नेने,माजी नगरसेविका सुनीता जोशी,माजी नगरसेवक अजय क्षीरसागर,हितेश पाटील,रविंद्र म्हात्रे, मितेश शहा, प्रभाकर पाटील, मच्छींद्र म्हात्रे, राधाकिशन बिसनोई, मधुसूदन पंड्या, पेण नगर परिषद अधिकारी, कर्मचारी यांच्यासह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी पेण नगर परिषद हद्दीतील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून आपले कलागुण व नृत्याविष्कार सादर केले.

 

FOLLOW US

INSTAGRAM

YOUTUBE