वैयक्तिक नृत्य स्पर्धेत (१३ वर्षा वरील) सिया पाटील ठरली अंतिम विजेती
पेण – दि. 18 (प्रतिनिधी) पेण नगरपरिषदेच्या भव्य मैदानावर स्वररंग तर्फे भरविण्यात आलेल्या पेण फेस्टिवल मध्ये आज वैयक्तिक नृत्य स्पर्धा १३ वर्षा वरील हि स्पर्धा पार पडली. यामध्ये एकूण २० स्पर्धकानी आणि उत्कृष्ठ असे नृत्याविष्कार सादर केले. या झालेल्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सिया पाटील, द्वितिय क्रमांक प्रदीप गुप्ता श्रावणी म्हात्रे तृतीय क्रमांक संयोग साळवी तर उत्तेजनार्थ पारितोषिक हिला मिळाले.
सदर स्पर्धेचे परिक्षण दर्शन म्हात्रे व शैलेश साळुंखे यांनी केले. अतिशय चांगले नृत्याविष्कार आज सादर केले आणि जे विजेते झाले ते अगदी थोड्याफार गुणाचा फरकाने झाले असल्याचे यावेळी परीक्षकांनी सांगितले. स्पर्धेचे उद्घाटन परीक्षकांच्या हस्ते करण्यात आले.
सर्व विजेत्यांना, स्वररंगचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र साळवी (सर), खजिनदार भारती साळवी, उपाध्यक्ष सुनिल पाटील, सचिव कौस्तुभ भिडे, पेण प्रेस क्लब अध्यक्ष देवा पेरवी, अनिकेत साळवी, मृगज कुंभार, अनिरुद्ध पवार, सारिका पाटील, नेहा कुंभार, निशा साळवी, अभिराज कणेकर, यश बांदीवडेकर, प्रसाद म्हात्रे, राज पाटील, सृष्टी सूर्यवंशी, प्रेरणा रामधरणे, तन्वी रामधरणे, श्वेता म्हात्रे, प्रशांत पाटेकर, दर्शना पाटेकर, किरण मोहिते आदि मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कौस्तुभ भिडे यांनी केले.यावेळी लकी ड्रो स्पर्धे मध्ये अंजली एकनाथ पाटील बोर्वे व मीनाक्षी विलास म्हात्रे उंबर्डे या विजेता ठरल्या त्याना साडी देऊन सौ.रेश्मा पाटील व सौ.सोनाली पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
तसेच यावेळी स्वररंग चे अध्यक्ष श्री. राजेंद्र साळवी सर यांनी दिनांक २२ नोव्हेंबर २०२३ रोजी भवर डान्स स्पर्धा होणार असल्याचे सांगितले.