पेण फेस्टिवल 2023 मिसेस रायगडची विजेती ठरली नागोठणेची मानसी मोकल…
पेण – दि. २० ( प्रतिनिधी ) पेण नगरपरिषदेच्या भव्य मैदानावर स्वररंग तर्फे भरविण्यात आलेल्या पेण फेस्टिवल मध्ये आनंददायी वातावरणात बाफणा ज्वेल्स प्रायोजित मिसेस रायगड 2023 ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत मानसी मोकल नागोठणे ही मिसेस रायगड २०२३ ची अंतिम विजेती ठरली तर पनवेलची प्रीती निर्मल फर्स्ट रनर अप, अलिबागची प्रीती पाटील सेकंड रनर अप आणि कांचन म्हात्रे पाटणेश्वर पेण यांना उत्तेजनार्थ विशेष पारितोषिक म्हणून गौरवण्यात आले. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील 15 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.सदर स्पर्धा बाफणा ज्वेलर्सचे प्रोप्रा. विशाल बाफणा व लीना बाफणा यांनी प्रायोजित केली होती, तसेच स्पर्धेचे मेकअप आणि हेअर स्टाईल श्री सद्गुरु अकॅडमी संलग्न रेड रोज ब्युटी क्लीनिक कृपा सचिन रावकर आणि दर्शना तावडे यांनी केली होती.
या स्पर्धेतील बेस्ट कॅटवॉक कृतिका सुटे ( वरसे – रोहा ) बेस्ट कॉस्टयूम वैष्णवी पाटील, (रोहा ) बेस्ट हेअर पौर्णिमा जैन, ( पनवेल ) बेस्ट स्माईल पौर्णिमा प्रधान, ( पेण ) तर बेस्ट पर्सनॅलिटी प्रतीक्षा मुळीक, (अलिबाग ) बेस्ट फोटोजनिक निधी मोरे ( मुंबई ) या स्पर्धकांना अवॉर्ड देऊन सन्मानीत करण्यात आले. सदर स्पर्धेचे परिक्षण अक्षता साळवी व ऍड. स्मिता कुथे यांनी केले तर कोरियोग्राफी शैलेश साळूंखे ( रोहा ) व साक्षी देवरुखकर यांनी केली.
सर्व विजेत्यांना, स्वररंगचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र साळवी ( सर ) खजिनदार भारती साळवी, पेण येथील प्रसिद्ध बाफणा ज्वेलर्सचे प्रोप्रा. विशाल बाफणा, लीना बाफणा, उपाध्यक्ष सुनिल पाटील, सचिव कौस्तुभ भिडे, पेण प्रेस क्लब अध्यक्ष देवा पेरवी, अनिकेत साळवी, अथर्व सावंत, मृगज कुंभार,अनिरुद्ध पवार, सारिका पाटील, नेहा कुंभार, निशा साळवी, अभिराज कणेकर, यश बांदीवडेकर, प्रसाद म्हात्रे, राज पाटील, सृष्टी सूर्यवंशी, प्रेरणा रामधरणे, तन्वी रामधरणे, श्वेता म्हात्रे, प्रशांत पाटेकर, दर्शना पाटेकर, किरण मोहिते, सौ.छाया भिडे आदि मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परेश दाभोळकर (मुंबई) यांनी केले.
पेण-रायगडसह नागोठणे, रोहा मुंबई, नवी मुंबई, कोल, अलिबाग, खोपोली, ठाणे, उरण अश्या विविध भागांतील एकूण 15 स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. ट्रेडिशन,इन्ट्रोड्यूस राउंड, वेस्टन राउंड व प्रश्नोत्तर राउंड अशा दोन राउंड मध्ये स्पर्धा सादर करण्यात आली. या स्पर्धेला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. आता दिवसेंदिवस पेण फेस्टिवलची रंगत वाढताना दिसत आहे. आता सर्व रसिक प्रेक्षकांना उत्सुकता आहे ती मिस रायगडची….