Banner Top
Monday, July 7, 2025

पेण – दि. 18 (प्रतिनिधी) पेण नगरपरिषदेच्या भव्य मैदानावर स्वररंग तर्फे भरविण्यात आलेल्या पेण फेस्टिवल मध्ये आज वैयक्तिक नृत्य स्पर्धा १३ वर्षा खालील हि स्पर्धा पार पडली. यामध्ये एकूण ३५ स्पर्धकानी आणि उत्कृष्ठ असे नृत्याविष्कार सादर केले.  या झालेल्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक विहान नाईक, द्वितिय क्रमांक श्रद्धा पाटील, तृतीय क्रमांक क्रीशा  टेमघरे तर उत्तेजनार्थ पारितोषिक दिक्षा भोपिकर हिला मिळाले.

सदर स्पर्धेचे परिक्षण साक्षी देवरुखकर  व अमित जाधव यांनी केले. अतिशय सुंदर सादरीकरण करुन प्रेक्षकांची वाहवा या स्पर्धकांनी मिळवली. निकाल लावणे अतिशय कठीण होते आणि सगळ्यांची चांगले सादरिकरण केल्याचे यावेळी परीक्षक साक्षी देवरुखकर यांनी सांगितले.

यावेळी स्पर्धेचे उद्घाटक म्हणून निवासी नायब तहसीलदार प्रसाद कालेकर पेण तहसील कार्यालय हे उपस्थित होते. तसेच यावेळी पेण पोलिस स्टेशनच्या पी.एस.आय मिनल शिंदे व पोलीस ज्ञानेश्वर सूर्यवंशी इतर मान्यवर देखील उपस्थित होते. सर्व विजेत्यांना, स्वररंगचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र साळवी (सर), खजिनदार भारती साळवी, उपाध्यक्ष सुनिल पाटील, सचिव कौस्तुभ भिडे, पेण प्रेस क्लब अध्यक्ष देवा पेरवी, अनिकेत साळवी, मृगज कुंभार,  अनिरुद्ध पवार, सारिका पाटील, नेहा कुंभार, निशा साळवी, अभिराज कणेकर, यश बांदीवडेकर, प्रसाद म्हात्रे, राज पाटील, सृष्टी सूर्यवंशी, प्रेरणा रामधरणे, तन्वी रामधरणे, श्वेता म्हात्रे, प्रशांत पाटेकर, दर्शना पाटेकर, किरण मोहिते आदि मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कौस्तुभ भिडे यांनी केले.यावेळी लकी ड्रो स्पर्धे मध्ये भाग्यश्री ठाकूर पेण व सायली प्रशांत पाटील जिते या विजेता ठरल्या त्याना साडी देऊन सौ.भारती साळवी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

तसेच यावेळी स्वररंग चे अध्यक्ष श्री. राजेंद्र साळवी सर यांनी दिनांक १९ नोव्हेंबर २०२३ रोजी होणारा वल्ड कप लाईव्ह आपण प्रेक्षकांसाठी फेस्टिवलमध्ये एल एडी स्क्रीन वर दाखविणार असल्याचे सांगितले

FOLLOW US

INSTAGRAM

YOUTUBE