आयुष चटर्जी ठरला पेण फेस्टीवल २०२३ मिस्टर रायगडचा विजेता…….
पेण – दि. 18 (प्रतिनिधी) पेण नगरपरिषदेच्या भव्य मैदानावर स्वररंग तर्फे भरविण्यात आलेल्या पेण फेस्टिवल मध्ये जल्लोषपूर्ण वातावरणात मिस्टर रायगड स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत खोपोलीचा आयुष चटर्जी हा मिस्टर रायगडचा अंतिम विजेता ठरला. तर चिपळूणचा हार्दिक घाग याने स्पर्धेत द्वितिय व ठाण्याचा अक्षय बाचम याने तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील 15 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेतील बेस्ट कॉस्टयूम गणेश पाटील (पेण), बेस्ट हेअर स्टाईल ओमकार कडव (रोहा), बेस्ट स्माईल गणेश शेरे (कर्जत) तर बेस्ट पर्सनॅलिटी अमित पाटील (अलिबाग) बेस्ट फोटोजनिक साहिल तलाठी (महाड) या स्पर्धकांना अवॉर्ड देऊन सन्मानीत करण्यात आले. सदर स्पर्धेचे परिक्षण अमोल कापसे, साक्षी देवरुखकर तर कोरियोग्राफी शैलेश साळूंखे (रोहा) यांनी केले.
सर्व विजेत्यांना, स्वररंगचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र साळवी (सर), खजिनदार भारती साळवी, उपाध्यक्ष सुनिल पाटील, सचिव कौस्तुभ भिडे, पेण प्रेस क्लब अध्यक्ष देवा पेरवी, अनिकेत साळवी, मृगज कुंभार, अनिरुद्ध पवार, सारिका पाटील, नेहा कुंभार, निशा साळवी, अभिराज कणेकर, यश बांदीवडेकर, प्रसाद म्हात्रे, राज पाटील, सृष्टी सूर्यवंशी, प्रेरणा रामधरणे, तन्वी रामधरणे, श्वेता म्हात्रे, प्रशांत पाटेकर, दर्शना पाटेकर, किरण मोहिते आदि मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परेश दाभोळकर (मुंबई) यांनी केले.
पेण-रायगड सह मुंबई, नवी मुंबई, कोल्हापूर, लोणावळा, अलिबाग, खोपोली, माणगाव, महाड, ठाणे, उरण अश्या विविध भागांतील एकूण 15 स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. ट्रेडिशनइन्ट्रोड्यूस राउंड, वेस्टन राउंड व प्रश्नोत्तर राउंड अशा दोन राउंड मध्ये स्पर्धा सादर करण्यात आली. या स्पर्धेला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. १० नोव्हेंबर २०२३ पर्यंत सुरू झालेला पेण फेस्टिवल दिवसेंदिवस रसिकांची गर्दी खेचत आहे.