पुरुषांमध्ये टीबीएम कारावी तर महिलांमध्ये हिरकणी गडब अंतिम विजेते…..
पेणः प्रतिनिधी
स्वररंग आयोजित पेण फेस्टिवल मध्ये जिल्हा स्थरिय पुरुष व महिला गटाच्या कबड्डी स्पर्धाचे प्रथमच आयोजन केले होते या स्पर्धेला पेण शहरासह तालुक्यातून उदंड प्रतिसाद लाभला होता. पुरुषांचा अंतिम सामना टीबीएम कारावी आणि शिवशंभो पाटणेश्वर यांच्यामध्ये रंगला तर महिलांचा अंतिम सामना हिरकणी गडब आणि शिव शंभो पाटणेश्वर यांच्या मध्ये रंगला. रात्रीचे एक वाजले तरी मैदानावर क्रिडा रसिक खचाकच भरलेले होते; पुरुषांच्या अंतिम सामन्यामध्ये टीबीएम कारावीने शिव शंभो पाटणेश्वर पर सहज विजय संपादन करून स्पर्धेत टीबीएम कारावी अंतीम विजेती ठरली तर महिलांच्या सामन्यात देखील हिरकणी गडबने आपला जिल्ह्यातील दबदबा कायम ठेवत अंतिम विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेचे बक्षिस वितरण स्वररंगचे अध्यक्ष राजेंद्र साळवी, उपाध्यक्ष सुनील पाटील, सचिव कौस्तुभ भिडे, रायगड जिल्हा असोशियनचे पांडूरंग पाटील, राष्ट्रीय समालोचक मिलींद पाटील, नगरसेवक संतोष पाटील, राष्ट्रीय कुस्तीपटू हिरामन भोईर, यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी प्रसार माध्यमांशी राजेंद्र साळवी यांनी बोलताना सांगितले की आम्ही पहिल्यांदाच कबड्डी च्या स्पर्धाचे आयोजन केले होते मात्र जो उदंड प्रतिसाद आम्हाला यंदा लाभला त्यामुळे मी आणि माझी पुर्ण टीम भारावून गेली आहे. तरी पुढच्या वर्षी ही स्पर्धा मोठ्या दिमाख्यात होईल तसेच यावर्षी ज्या त्रुटी राहिल्यात त्या पुढच्या वर्षी राहणार नाहीत याची खबरदारी घेऊ असे सांगितले.