Banner Top
Monday, July 7, 2025

गणेशोत्सवानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शुभेच्छा
मुंबई, दि. 18 : विद्या आणि कलांचा अधिपती असलेल्या गणरायाच्या आगमनानिमित्त राज्यातील जनतेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. निर्बंधमुक्त उत्सव साजरा करत असताना समाजभान जपण्याचे व पर्यावरणाची हानी टाळण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, महाराष्ट्राची समृद्ध परंपरा असलेला गणेशोत्सव आता केवळ राज्यातच नव्हे तर देश-विदेशातही मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आपण सर्वजण लाडक्या विघ्नहर्त्याची दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतो. आपली संस्कृती, परंपरा व सामाजिक ऐक्य जपण्याचे कार्य या उत्सवाने केले आहे. गणेश मंडळांनी वर्षानुवर्षे स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत समाजप्रबोधनाचे कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक मनोरंजन, आरोग्य शिबीर आदी उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधीलकी जपली आहे. त्यामुळे राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफीसह अन्य सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. हा उत्सव साजरा करताना पर्यावरणाची हानी होणार नाही, निर्माल्य ठरलेल्या ठिकाणीच एकत्रित केले जाईल, याची काळजी गणेश मंडळ व भाविकांनी घ्यावी, असे आवाहनही यानिमित्ताने उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले आहे.

FOLLOW US

INSTAGRAM

YOUTUBE