बळवली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर
श्रीराम ज्ञानाई वारकरी मंडळ बळवली व JSW संजीवनी हॉस्पिटल यांच्या सौजन्याने शिबिराचे आयोजन
पेण ( विनायक पाटील ) :
ग्रामपंचायत बळवली, श्रीराम ज्ञानाई वारकरी मंडळ यांच्या तर्फे व संजिवनी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आज मंगळवार १२/९/२०२३ रोजी वेळ सकाळी ११ ते दुपारी ३ या दरम्यान श्रीराम मंदिर बळवली येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिरात पोटाचे विकार, आम्लपित्त, नेत्ररोग, संधिवात, आमवात, सांध्यांचे विकार, मणक्याचे विकार, मुत्राशयाचे विकार, किडनीचे विकार, हृदयरोग, श्वस- नाचे विकार, न्युरोसर्जरी, त्वच- रोग, दातांचे विकार, गर्भाशयाचे विकार अशा आजारावर तपासणी करण्यात येणार आली. या शिबिराचा एकूण 90 नागरिकांनी लाभ घेतला. हा शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अमित महाराज रमेश पाटील कमलाकर पाटील ज्योतीराम पाटील हरिभाऊ पाटील जनार्दन पाटील गोपीनाथ पाटील प्रमोद पाटील व नरेंद्र ठाकूर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शिबिराला आलेल्या नागरिकांची डॉक्टर श्रद्धा शिंदे, सिद्धार्थ शिंदे ,ओमकार कटक, सोनाली थले, विनीत पाटील, निलेश म्हात्रे, भूषण पाटील यांनी मोफत तपासणी करून त्यांचे निदान केले व मोफत औषधे ही दिली.
बलवली गावातील अनेक कार्यक्रमांना व या शिबिराला ही लीना बाफना व विशाल बाफना या दांपत्यांकडून सहकार्य लाभले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.