पेण – अल्पावधीत लोकप्रिय झालेला महामुंबई न्यूज नेटवर्क चॅनलचा वर्धापन दिन सोहळा पनवेल येथे मोठ्या उत्साहात पार पडला. गोरगरीब पीडित जनसामान्यांना न्याय मिळवून देण्याकरिता पत्रकारांची भूमिका मोलाची असते महामुंबई न्युज नेटवर्क च्या माध्यमातून मागील वर्षभरात जनसामान्यांचे प्रश्न ऐरणीवर मांडून शेकडो नागरिकांना न्याय मिळवून दिल्यानेच आज महामुंबई न्युज नेटवर्क लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला असल्याचे गौरव उद्गार महामुंबई चैनल चे मालक मुनावर सुलताना यांनी पनवेल येथे प्रथम वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात काढले.
पत्रकारिता, वृत्तपत्र, चॅनेल ही माध्यमे पैसे कमवण्याकरिता नसून समाजातील नागरिकांचे समस्या प्रशासना समोर मांडून शासन, प्रशासन व नागरिकांमधील दुवा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पत्रकारितेच्या माध्यमातून प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांवर आसूड ओढलेच पाहिजे. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. लोकशाही मजबूत करण्याकरिता वृत्तपत्र व न्युज चॅनेल्स् चे योगदान उल्लेखनीय आहे. महामुंबई न्युज नेटवर्कच्या पत्रकारांनी वर्षभरात उत्तम कामगिरी केली असून आज महामुंबई न्युज नेटवर्क सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय आहे. यावेळी महामुंबई न्युज नेटवर्कच्या सर्वोसर्वा मुनावर सुलताना यांच्या शुभहस्ते पत्रकारांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी आभार प्रदर्शन करताना पत्रकार धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, चॅनेलच्या मालक मुनावर सुलताना व संपादक मिलिंद खारपाटील यांनी घेतलेल्या अपार कष्टामुळे व योग्य मार्गदर्शनाने पत्रकारांचे मनोबल वाढले त्यामुळे काम करायला अधिक प्रोत्साहन मिळाले. त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत असे मनोगत धर्मेंद्र प्रधान, नंदकुमार तांडेल यांनी यावेळी व्यक्त केले.
विश्वशांती करिता कार्यरत असलेल्या ब्रह्मकुमारी ओम शांती अध्यात्मिक संस्थेच्या शुभदा नील यांनी महा मुंबई न्यूज नेटवर्कच्या वर्धापन दिनाकरिता मोफत हॉल उपलब्ध करून दिला तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांना रक्षाबंधन करण्यात आले. यावेळी इस्पाचे माजी जनरल मॅनेजर समन बर्धन यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमाला माझी महापौर कविता चौतमल, मुंबईचे माजी पोलीस सहायुक्त एकनाथ खोल्लम, लायन क्लबचे सलीम नागानी, साबिरा सय्यद, कफ चे सल्लागार आणि एस टी चे चिप इंजिनियर राजकुमार ताकमोघे, कामगार नेता महादेव घरत, आदर्श शिक्षिका शारदा खारपाटील,कवी एल बी पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत ने करण्यात आली.