कोकण रेल्वेच्या 12 रेल्वे स्थानकाच्या विकास कामांचा भूमिपूजन समारंभ आज रोजी पार पडला. यात रायगड जिल्हा तील विर, माणगाव, व कोलाड या तीन स्थानकातील रस्ता काँक्रीटीकरण व सुशोभी करण या कामाचा भूमिपूजन समारंभ ऑनलाईन पद्धतीने पार पडला यावेळी विर स्टेशन येथे आमदार प्रशांत ठाकूर, व भाजपा लोकसभा निवडणूक प्रमुख सतीश धारप, माणगाव येथे भाजपा द.रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, भाजपा उ.रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी तसेच कोलाड येथे आमदार रविशेठ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी मुंबई येथून मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, मंत्री अतुल सावे, उद्योग मंत्री उदय सामंत तसेच इतर मंत्री, रेल्वे चे पदाधिकारी, कर्मचारी,उपस्थित होते.
यावेळी रवींद्र चव्हाण साहेब यांनी प्रास्ताविक केले कोकण परिसर विकासासाठी रेल्वे स्टेशनचा विकास होणे आवश्यक आहे. असे सांगितले. यावेळी मनोगत व्यक्त करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की कोकणच्या विकासासाठी पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी राज्य सरकारचा भर असणार आहे. मा. मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, कोकणच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असे रेल्वे स्थानकांचा परिसर सुशोभीकरण सोयी सुविधा रस्ते मिळणे आवश्यक आहे. ह्या मुळे कोकणच्या विकासात भर पडणार आहे. मुंबई गोवा हायवे देखील आपण लवकर पूर्ण करू या करिता बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण साहेब स्वतः लक्ष देऊन काम करत आहेत.
यावेळी आमदार रविशेठ पाटील यांनी सांगितले की, या कोलाड येथे होणाऱ्या विकास कामामुळे रेल्वे स्थानकाचे कायापालट होण्यास मदत होईल. सर्व सामान्य नागरिक याना याचा फायदा होईल.व हे भूमिपूजन झाल्याचे देखील सांगितले.
यावेळी कोलाड रेल्वे स्थानकावर मा.विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील, भाजपा पेण तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील, रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांभेकर,सुधागड तालुका अध्यक्ष दादा घोसाळकर, रेल्वे पदाधिकारी, कर्मचारी तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, मारुती देवरे, आनंद लाड, श्रेया कुंटे, माधुरी रावकर, युवा मोर्चा अध्यक्ष अमित घाग , महेश ठाकूर व इतर कार्यकर्ते, रेल्वे प्रवासी, सार्वजनिक बांधकाम विभाग पदाधिकारी, इंजिनियर, सर्व पक्षीय नेते आणि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.