पेण, ता. ८ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रकाश झावरे यांच्या मातोश्री सुशीला सुभाष झावरे यांचे वयाच्या ७० व्या वर्षी दि.३ ऑगस्ट रोजी दुःखद निधन झाले.त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ आणि मनमिळावू असल्याने त्यांना अनेक जण ओळखत होते.त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना चांगले संस्कार व शिक्षण दिले त्यामुळे त्यांचा एक मुलगा प्रकाश झावरे यांनी पेण तालुक्यासह रायगड जिल्ह्यात उद्योजक व्यवसाय क्षेत्रात चांगले नाव कमविले आहे.त्यामुळे त्यांच्या मातोश्री सुशिला झावरे यांच्या अंत्ययात्रेत असंख्य उद्योजक, नागरिक उपस्थित होते.त्यांच्या पश्चात त्यांना पती सुभाष कोंडाजी झावरे, मुले प्रकाश आणि सिध्देश झावरे, सुना नेहा आणि श्र्वेता झावरे, नातवंवडे पियुष, शुभ्रा, विहान असा मोठा परिवार असून त्यांचा दहावा १३ ऑगस्ट रोजी हरिहरेश्वर येथे होणार आहे तर तेरावा १५ ऑगस्ट रोजी श्री सत्यनारायण रेसिडेन्सी कारमेल हायस्कूल पेण येथे राहत्या घरी होणार आहे.