Banner Top
Sunday, September 21, 2025

 

पेण प्रतिनिधि – किरण बांधणकर
महसूल सप्ताह अंतर्गत”सैनिक हो तुमच्यासाठी”. तालुकास्तरीय सैनिक कल्याण समिती बैठक पेण तहसिल कार्यालयात घेण्यात आली.
यावेळी यावेळी प्रांताधिकारी प्रवीण पवार तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, नायब तहसीलदार नितीन परदेशी, माजी सैनिक संघनेचे अध्यक्ष सुरेंद्र ठाकुर मिलिंद बोचरेयांच्यासह महसूल कर्मचारी व माजी सैनिक उपस्थित होते.
आजी व माजी सैनिक, वीरमाता व वीर पत्नी यांचा यथोचित सन्मान करणे.ध्वजदिन निधीचे संकलन करणे,सैनिकांच्या प्रलंबित विषयांचा निपटारा सैनिकांना विविध दाखले, प्रमाणपत्र, जमीन इत्यादी वाटप. या विषयावर चर्चा करण्यात आली.
पेण तहसिल कार्यालयाच्यावतीने महसूल सप्ताह होणार आहे या सप्ताहात युवा संवाद, एक हात मदतीचा, जनसंवाद, सैनिक हो तुमच्यासाठी, कार्यरत, निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यासह विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती देखील यावेळी स्वप्नाली डोईफोडे यांनी दिली.