Banner Top
Monday, July 7, 2025

पुणे मेट्रोच्या पूर्ण झालेल्या दुसऱ्या टप्प्याच्या, सेवांचं उद्घाटन आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासानं देशाच्या औद्योगिक विकासाला गती दिली, असं प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केलं.कचऱ्यातून उर्जा या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रकल्पाचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांनी केलं. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं बांधलेल्या सहा हजार चारशेहून अधिक घरांचं, तसंच प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेनं बांधलेल्या १ हजार २८० हून अधिक आणि पुणे महापालिकेनं बांधलेल्या २ हजार ६५० हून अधिक घरांचं, हस्तांतरण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. तसंच पिंपरी चिंचवड महापालिकेद्वारे बांधण्यात येणाऱ्या सुमारे १ हजार १९० घरांची पायाभरणीही त्यांनी केली. या विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी मोदी यांचं सिंचननगर हेलिपॅड इथं आगमन झालं, तेव्हा राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचं स्वागत केलं. तत्पूर्वी लोहगाव विमानतळावर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. (AIR NEWS)

FOLLOW US

INSTAGRAM

YOUTUBE