Banner Top
Monday, July 7, 2025

दिनांक 5ऑगस्ट 2023 रोजी राजेंद्र साळवी सर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मा.विरोधीपक्षनेते रा.जि.प. तथा उपाध्यक्ष भाजपा दक्षिण रायगड मा.श्री.वैकुंठ पाटील यांच्या हस्ते स्व भारत या वेब न्युज पोर्टल चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी निर्माता संपादक कौस्तुभ भिडे, निर्माता व मुख्य संपादक राजेंद्र साळवी सर, कार्यकारी संपादक सुनील पाटील,उपसंपादक प्रसाद म्हात्रे, प्रतिनिधी प्रसाद वसंत म्हात्रे यांच्यासह सर्व प्रतिनिधी पेण प्रेस क्लब अध्यक्ष देवा पेरवी, पुढारीचे प्रतिनिधी कमलेश ठाकूर, स्वररंगच्या खजिनदार भारती साळवी, स्वररंगचे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. यावेळी निर्माते व मुख्य संपादक साळवी सर यांनी या वेब पोर्टल चा उद्देशहा लोकांचा आवाज लोकांच्या समस्या तसेच देशात घडणाऱ्या घडामोडी याना वाचा फोडणे अन्यायाविरुद्ध लढणे सामान्याचा मनाचा आवाज बनणे असा आहे. असे सांगीतले. तसेच या वेब पोर्टल च्या माध्यमातून नवीन उद्योजक किंवा समाजसेवक याना मुलाखतीद्वारे प्रकाश झोतात आणण्याचे काम देखील करणार असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित सर्वाचे निर्माता संपादक कौस्तुभ भिडे यांनी आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला.

FOLLOW US

INSTAGRAM

YOUTUBE